मुंबईकरांसाठी मोठी बातमी! आता मास्क नसेल तर... पालिकेने घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबईत पालिकेकडून मास्क नसेल तर दंडात्मक कारवाई केली जाते, पण आता...

Updated: Mar 23, 2022, 07:18 PM IST
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! आता मास्क नसेल तर... पालिकेने घेतला महत्त्वाचा निर्णय title=

मुंबई : राज्यासह मुंबईत (Mumbai) कोरोनाच्या (corona) दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पन्नासहून कमी रुग्ण आढळत आहेत. अशात मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

मास्क न घातल्यास होणाऱ्या दंडात्मक कारवाईपासून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेनं (BMC)  मार्शलना (clean up Marshal) दंडात्मक कारवाईची कडक अंमलबजावणी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर आता मुंबईत क्लिन अप मार्शलकडून मास्क न घातल्याबाबतची कारवाई आता थंडावणार आहे.

असं असलं तरी मास्क मात्र लावावाच लागणार आहे. कोरोनाचा आलेख घसरला असला तरी अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव पुर्णपणे थांबलेला नाही. अशात नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून मास्कमुक्तीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे मास्क वापरवाचा लागणार नाही. पण दंडात्मक कारवाईमध्ये शिथिलता येणार आहे. 

कोरोना नियमातून शिथिलता
कोरोना नियमाबांबत केंद्र सरकराने नवीन गाईडलाईन (New Guidlines) जारी केल्या आहेत. कोरोनाचे निर्बंध 31 मार्चपासून हटविण्यात येणार आहे. असं असलं तरी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग मात्र अनिवार्य असणार आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आहे.

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग (Covid-19) हळूहळू कमी होऊ लागला आहे आणि आता दररोज दोन हजारांहून कमी रुग्ण संख्या नोंदवली जात आहेत. यानंतर, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने कोविड प्रतिबंधात्मक उपायांसाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी रद्द केल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या सतत वाढत असलेल्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, सरकारने जवळपास दोन वर्षांनंतर 31 मार्चपासून कोविड-19 शी संबंधित सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मात्र लागू राहणार आहेत.