Sameer Wankhede CBI Raid: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर देशभरात या प्रकरणाची चर्चा रंगली. 2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईत एनसीबीने (Narcotics Control Bureau) एका क्रूझ जहाजावर हाय-प्रोफाइल पार्टीवर छापा टाकला होता. यात आर्यन खानसह 20 लोकांना अटक केली. सुमारे तीन आठवडे तुरुंगात राहिल्यानंतर आर्यन याची जामिनावर सुटका झाली. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या नेतृत्वात हा छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी समीर वानखेडे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर होते.
आता दोन वर्षांनंतर समीर वानखेडे पुन्हा चर्चेत आले आहेत. सीबीआयने (CBI) समीर वानखेडे यांच्याविरोधात भ्रष्टचाराचाप्रकरणी खटला दाखल केला आहे. समीर वानखेडे यांच्याबरोबर आर्यन खान अटक प्रकरण्यातील आणखी काही अधिकाऱ्यांची नावं पुढे आली आहेत. आता याप्रकरणाती एक मोठा खुलासा समोर आला आहे.
शाहरूख खानकडून वसूली?
समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांच्या कुटुंबियांकडून 25 कोटी रुपयांची वसूली करायची होती, असा सीबीआयचा दावा आहे. याप्रकरणातील प्रमुख साक्षीदार प्रभाकर सैल यांनी केलेल्या खुलाशात आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. यात अर्धा वाटा समीर वानखेडेंचा तर उरलेली रक्कम इतर अधिकाऱ्यांचा असा हिस्सा ठरवण्यात आला होता असा दावाही करण्यात आला आहे.
या खुलाशानंतर NCB ने समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमविरोधात चौकशी सुरु केली तसंच समीर वानखेडे आणि त्यांची टीम करत असलेल्या सर्व प्रकरणाच्या चौकश्या त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्या. चौकशीत समीर वानखेडे आणि त्यांची टीम भ्रष्टाचाराशी जोडले गेले असल्याचं समोर आलं. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांविरोधात एनसीबीकडून सीबीआयमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
50 लाख रुपये अॅडव्हान्स
समीर वानखेडे यांच्या आदेशानंतर त्यांच्या टीमने ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांवर ड्रग्स बाळगल्याच्या आरोपाची धमकी दिल्याचं सीबीआयने म्हटलंय. 25 कोटी रुपये वसूल करणाऱ्या कटात या सर्वांचा समावेश होता, याचात एक भाग म्हणजे त्यांच्या टीमने 50 लाख रुपये अॅडव्हानही घेतले होते. याप्रकरणात सीबीआयने रांची, मुंबई, लखनऊ आणि चेन्नईसमवेत 29 जागांवर सर्च ऑपरेशन केलं. यात काही महत्त्वाची कागदपत्र आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
आर्यन खानप्रकरणाआधी समीर वानखेडे यांची पोस्टिंग एअरपोर्टच्या कस्टम विभागात होती. परदेशात खरेदी केलेल्या वस्तूंच्या कस्टम ड्युटीच्या मुद्द्यावर अभिनेता-अभिनेत्रींना रोखण्यासाठी वानखेडे यांचं नाव प्रसिद्ध होतं. सुशांत सिंह राजपूत ड्रग्स प्रकरणातही समीर वानखेडे यांनी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ आणि इतर काही लोकांना अटक केली होती.