धक्कादायक! मुंबईतील पवईमध्ये पोलिसांवर दगडफेक

Stone pelting on Mumbai Police: झोपडपट्टीवासियांवर पालिकेकडून कारवाई केली जात असताना जमाव संतप्त झाला. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 6, 2024, 04:41 PM IST
धक्कादायक! मुंबईतील पवईमध्ये पोलिसांवर दगडफेक  title=
Stone pelting on Mumbai Police

Stone pelting on Mumbai Police: मुंबईतील पवईमध्ये पोलिसांवर दगडफेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले आहेत. संतप्त जमावाने मोठ्या प्रमाणात ही पोलिसांवर दगडफेक केल्याचे बोलले जात आहे. झोपडपट्टीवासियांवर पालिकेकडून कारवाई केली जात असताना जमाव संतप्त झाला. त्यामुळे ही घटना घडली. 

7 पोलीस कर्मचारी जखमी 

3 जून झोपडपट्टीवासियांना नोटीस देण्यात आल्या होत्या. यानंतर 6 तारखेला पोलीस पोहोचले. यावेळी जमावाने मोठ्या प्रमाणात पोलिसांवर दगडफेक केली. पवईमधील जयभीम नगर झोपडपट्टीवर बीएमसीकडून तोडक कारवाई करण्यात आलीये. या कारवाईविरोधात संतप्त जमावानं पोलिसांवर दगडफेक केली..यामध्ये 7 पोलीस कर्मचारी जखमी झाले आणि दगडफेकीत दोन जासीबी, एक अॅम्ब्युलन्स, पोलिसांची गाडी फोडण्यात आलीये...राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

जागा सरकारी असल्याचा दावा

जय भीमनगरमध्ये काही वर्षापूर्वी आग लागली होती. त्यामुळे अनेक जण बेघर झाले होते. हे सर्वजणं पुन्हा त्याच ठिकाणी झोपड्यांमध्ये राहु लागले. मात्र ही जागा सरकारी असल्याचा दावा करत बीएमसीनं या सर्व झोपडपट्ट्यांना नोटीस बजावली होती. दरम्यान आज या झोपडपट्टीवर कारवाई करताना संतप्त नागरिकांनी पोलीस तसंच बीएमसीच्या कर्मचा-यांवर तुफान दगडफेक केली..