पाहा, मुंबईत कोणत्या भागात किती हवा शुद्ध

 शहरात यंदा दिवाळीत मागच्या वर्षीच्या तुलनेत फटाके कमी फोडले गेले आहेत, तरी हवेचा दर्जा

Updated: Nov 13, 2018, 10:55 PM IST
पाहा, मुंबईत कोणत्या भागात किती हवा शुद्ध title=

सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : शहरात यंदा दिवाळीत मागच्या वर्षीच्या तुलनेत फटाके कमी फोडले गेले आहेत, तरी हवेचा दर्जा काही शहरात अतिवाईट झालेला पाहायला मिळतोय. ज्याचा परिणाम म्हणजे सकाळच्या वेळात पाहायला मिळणारे धुरके. 'सफर' या प्रदूषणमापन प्रणालीतर्फे मिळालेल्या आकडेवारीनुसार मुंबईत बोरिवली, अंधेरी, मालाड, माझगांव या ठिकाणी हवेच्या स्तरावर परिणाम झाला आहे.  

अंधेरीची हवा सातत्याने 'अतिवाईट' स्तरावर नोंदवली गेली. तर मालाड, बोरिवली येथील हवा 'वाईट' ते 'अतिवाईट' दरम्यान दिवसागणिक बदलत आहे.  प्रदूषित वायूंच्या घटकाचे आणि धूळ मातीचे प्रमाण वाढल्याने मुंबईत सकाळी धुरके तयार होत आहे. 

मुंबईत कोणत्या भागात हवेची गुणवत्ता कशी आहे, ते खालील तक्त्यात पाहा.

अंधेरी - हवेची गुणवत्ता - ३४२ - अतिवाईट 

माझगाव - हवेची गुणवत्ता- ३१५- अतिवाईट

मालाड - हवेची गुणवत्ता -३०५- अतिवाईट

नवी मुंबई -  हवेची गुणवत्ता १४७- मध्यम

चेंबूर-  हवेची गुणवत्ता- ११७ - मध्यम