आधुनिक चाणक्यांनी महाराष्ट्रात फोडाफोड करणं थांबवावं; उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

 सावजाची शिकार मीच करेन, त्यासाठी दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही, असंही उद्धव यांनी स्पष्ट केलंय

Updated: Jul 23, 2018, 11:45 AM IST

मुंबई: आधुनिक चाणक्यांनी महाराष्ट्रात फोडाफोड करणं थांबवावं, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला आहे. आधुनिक चाणक्य पक्षासाठी चाणक्यनिती वापरतायत, अशी टीकाही त्यांनी केली आहे. सामनामधून आजपासून उद्धव ठाकरेंची मॅरॅथॉन मुलाखत प्रसिद्ध होतेय, त्यामध्ये  उद्धव ठाकरेंनी जोरदार टोलेबाजी सुरू केलीआहे. त्याचबरोबर सावजाची शिकार मीच करेन, त्यासाठी दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही, असंही उद्धव यांनी स्पष्ट केलंय. त्याचवेळी मित्राचं चुकत असेल तर मी बोलणारच, हेही उद्धव यांनी ठासून सांगितलं. हिंदुत्वाच्या नावावर हल्ले चालणार नाहीत, हेही उद्धव यांनी स्पष्ट केलं. 

पाहा आणखी काय म्हणाले उद्धव..