'मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर' याबातमीवर विद्यापीठाचा खुलासा

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. दुरस्त व अध्ययन शिक्षण संस्था (आयडॉल) च्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका झेरॉक्ससाठी चक्क सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर असल्याचे उघडकीस आले आहे, अशी माहिती मिळाली होती. यावर आता मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभागाकडून खुलासा सादर करण्यात आला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 5, 2023, 07:12 AM IST
'मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर' याबातमीवर विद्यापीठाचा खुलासा  title=

Mumbai University Answer Sheet: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. दुरस्त व अध्ययन शिक्षण संस्था (आयडॉल) च्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका झेरॉक्ससाठी चक्क सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर असल्याचे उघडकीस आले आहे, अशी माहिती मिळाली होती. यावर आता मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभागाकडून खुलासा सादर करण्यात आला आहे. 

काय म्हटलंय खुलासामध्ये?

आयडॉलचा परीक्षा विभाग पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा घेत असतो व त्याचे निकाल जाहीर करत असतो. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ अन्वये निकाल जाहीर केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेच्या छायांकित प्रतीची मागणी केलेली असते, त्यांना उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत देणे हे बंधनकारक आहे. यासाठी आयडॉलच्या इमारतीमध्ये तळमजल्यावर स्वतंत्र झेरॉक्स केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे २४ तास मुंबई विद्यापीठाचे सुरक्षारक्षक तैनात आहेत व ही जागा सी सी टी.व्ही च्या नियंत्रणात आहे. सदरचे झेरॉक्स केंद्र हे आयडॉलच्या इमारतीत असून ते सार्वजनिक नाही. आयडॉलच्या स्टाफला व विद्यार्थ्यांना झेरॉक्स काढण्यासाठी सदरचे झेरॉक्स केंद्र सुरू करण्यात आलेले आहे.

(सविस्तर बातमी - धक्कादायक! मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर)

निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज केलेले होते त्यापैकी काही विद्यार्थी छायांकित प्रत घेण्यासाठी आलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत सेवा देण्यासाठी परीक्षा विभागातील स्थायी कर्मचारी हा स्वतः वर उल्लेख केलेल्या आयडॉल इमारतीतील झेरॉक्स केंद्रावर उत्तर पत्रिकेच्या छायांकित प्रती काढत असतानाचा व्हिडीओ हा वास्तवाचा विपर्यास आहे .   

सदरच्या उत्तरपत्रिका कोऱ्या नसून या निकाल जाहीर झाल्यानंतर छायांकित प्रती मागितलेल्या होत्या. यामध्ये कोणतीही गोपनीयता नसते. तसेच आयडॉलमध्ये अद्याप OSM प्रणाली कार्यरत केली नसल्याने ह्या उत्तरपत्रिका स्कॅन झालेल्या नव्हत्या. त्यामुळेच त्यांचे झेरॉक्स काढणे गरजेचे असते. सदरच्या बातमीमध्ये सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर उत्तरपत्रिका सापडल्या किंवा या उत्तरपत्रिकाचा गैरवापर होऊ शकतो असे म्हणणे चुकीचे आहे. सदरची बातमी ही निराधार असून विद्यापीठ व आयडॉलला मुद्दाम बदनाम करण्याचा प्रकार आहे. यामध्ये कोणतेही गैरप्रकार होण्याच्या शक्यता नाहीत व तो गोपनीयतेचा भंगही नाही. अशा प्रकारामुळे दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होतात.