मुंबई विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षांचा पॅटर्न जाहीर

पदवीच्या अंतिम वर्ष परीक्षेचा पॅटर्न मुंबई विद्यापीठाने जाहीर केलाय.

Updated: Sep 9, 2020, 11:15 PM IST
मुंबई विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षांचा पॅटर्न जाहीर title=

मुंबई : पदवीच्या अंतिम वर्ष परीक्षेचा पॅटर्न मुंबई विद्यापीठाने जाहीर केलाय. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा १ ते १७ ऑक्टोबरमध्ये होतील. परीक्षा ऑनलाईन बहुपर्यायी पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. अंतिम वर्ष प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट, viva परीक्षा या प्रत्येक महाविद्यालयांनी ऑनलाइन पद्धतीने झूम ऍप, गुगल मीट यासारख्या ऍपद्वारे आणि तोंडी परीक्षा फोनवरून घेण्याच्या सूचना दिल्यात. या परीक्षा १५ सप्टेंबरपासून घेण्यात येणार आहे. 

अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी खास महाविद्यालयांचं क्लस्टर तयार करण्यात येईल. ५० मार्कच्या परीक्षेसाठी १ तासाची वेळ असेल. 

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा अजूनपर्यंत घेण्यात आल्या नाहीत. सुप्रीम कोर्टानेही अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असं स्पष्ट केलं, त्यानंतर राज्य सरकारकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्या. अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या, याबाबत राज्यातल्या विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती स्थापन करण्यात आली.