मुंबई विद्यापीठाच्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी

मुंबई विद्यापीठाच्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी...

Updated: Dec 16, 2017, 06:10 PM IST
मुंबई विद्यापीठाच्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी title=

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी...

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता मुंबई विद्यापीठानं विद्यार्थ्यांना पुरवणी देण्याचा निर्णय घेतलाय. तसं परिपत्रक सर्व महाविद्यालयांना पाठवण्यात आलंय. 

एखाद्या विद्यार्थ्यांनं परीक्षेत पुरवणी मागितल्यास ती नाकारता येणार नसल्याचं मुंबई विद्यापीठानं आपल्या परिपत्रकात म्हटलंय. 

ऑनलाईन असेसमेंटच्या प्रक्रियेत पुरवणी अडथळा असल्याचं सांगत मुंबई विद्यापीठानं मुख्य उत्तरपत्रिका पुरेशी असल्याचं सांगितलं होतं.

मुंबई विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात होती. त्यामुळे आता कोर्टाच्या आदेशानुसार विद्यापीठानं आपला निर्णय मागे घेतलाय.