मुंबईकरांना दिलासा, भाज्यांचे दर झाले कमी

बातमी मुंबईकरांना दिलासा देणारी..भाज्या स्वस्त झाल्यायत....हिवाळ्यात भाजीपाल्याचं उत्पन्न चांगलंच वाढलंय. 

Updated: Jan 29, 2018, 12:26 PM IST
मुंबईकरांना दिलासा, भाज्यांचे दर झाले कमी

मुंबई : बातमी मुंबईकरांना दिलासा देणारी..भाज्या स्वस्त झाल्यायत....हिवाळ्यात भाजीपाल्याचं उत्पन्न चांगलंच वाढलंय. 

भाज्यांचं उत्पन्न वाढल्यामुळे नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वढलीये. नेहमीपेक्षा भाजीपाल्याचे ५० जादा ट्रक आज मार्केटमध्ये दाखल झालेत. 

त्यामुळे भाज्यांचे घाऊक दर उतरलेत. सहाजिकच यामुळे भाज्यांच्या किरकोळ दरातही आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.. सध्या भाज्यांचे किरकोळ दर कसे आहेत यावर एक नजर टाकूयात.