कोरोनाच्या काळात ऑक्सिजन घरपोच पुरवणारे मुरजी पटेल ठरले 'ऑक्सिजन मॅन'

ऑक्सिजनचा तुटवडा लवकरच पूर्ण होणार

Updated: Apr 27, 2021, 05:45 PM IST
कोरोनाच्या काळात ऑक्सिजन घरपोच पुरवणारे मुरजी पटेल ठरले 'ऑक्सिजन मॅन' title=

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. पण या परिस्थितीतही कोरोनाबाधितांचा आकडा काही आटोक्यात येत नाही. या परिस्थितीतही अनेकांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहेत. अशावेळी अनेक लोकं समोर येऊन असंख्य मदत करत आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत असता 'ऑक्सिजन मॅन' समोर आले आहेत. 

अंधेरीतील जीवन ज्योत प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री मुरजी पटेल काका ह्यांच्या संकल्पनेतून व माध्यमातून ऑक्सीजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन सेवा अशा गंभीर रुग्णांना घरपोच देण्यात येत आहेत. या तात्काळ व घरपोच सेवेमुळे आजपर्यंत 100 हून अधिक लोकांचे जीव वाचवण्यात संस्थेला यश मिळाले आहे. मुरजी पटेल यांना आज अंधेरीतील जनता 'ऑक्सिजन मॅन' म्हणून आदराने संबोधताहेत.

Thank you Sir, we are so honored to serve under your able command. We are going to do whatever it takes to help every...

Posted by Murji Patel on Monday, April 26, 2021

संपूर्ण मुंबई मध्ये सध्या कोविड पेशंट करिता ऑक्सिजनची कमतरता आहेच सोबत कोविड  रुग्णालयांत बेड देखील उपलब्ध नाहीत. अशावेळी मुंबईतील अंधेरी पूर्व विभागातील कोरोनग्रस्त रुग्णांना ज्यांना रुग्णालयांत बेड व ऑक्सीजन मिळत नाहीत अशा गंभीर प्रकृतीच्या रुग्णांच्या घरी ऑक्सीजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून देण्यात येत आहेत.