राणेंनी भाजपची ऑफर स्वीकारावी - आठवले

नारायण राणेसाहेब यांची राज्याला जास्त गरज आहे. त्यामुळे राणे राज्यसभेवर जाणार की नाही, याची उत्सुका आहे. राणे भाजपची ऑफर स्विकारणार की नाही, याची चर्चा आता सुरु झालेय. दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राणेंनी भाजपची ऑफर स्वीकारावी असे म्हटले आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 3, 2018, 06:11 PM IST
राणेंनी भाजपची ऑफर स्वीकारावी - आठवले title=

मुंबई : नारायण राणेसाहेब यांची राज्याला जास्त गरज आहे. त्यामुळे राणे राज्यसभेवर जाणार की नाही, याची उत्सुका आहे. राणे भाजपची ऑफर स्विकारणार की नाही, याची चर्चा आता सुरु झालेय. दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राणेंनी भाजपची ऑफर स्वीकारावी असे म्हटले आहे. 

नितेश राणेंचे ट्विटने राजकीय चर्चा

नारायण राणे यांची महाराष्ट्राला जास्त गरज असल्याचे ट्विट काँग्रेस आमदार आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांनी केले आहे. राज्यसभेसाठी राणे इच्छुक नसल्याचेही नितेश यांनी या ट्विटमध्ये नमूद केलंय. दोन दिवसांपूर्वी राणेंनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा उपस्थित होते. 

राणे भाजपची ऑफर स्वीकारणार का?

राज्यातल्या राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. विधानसभेतल्या संख्याबळानुसार भाजपाचे तीन खासदार निवडून येऊ शकतात. त्यामुळे भाजपाच्या कोट्यातून राणेंची वर्णी लागण्याची शक्यता आता वर्तवली जातेय. झी मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्येही अशी ऑफर भाजपने दिल्याचे नारायण राणेंनी म्हटलं होतं. मात्र आता नितेश राणेंच्या ट्विटमुळे राणे राज्यसभेसाठी इच्छुक नसल्याचे समोर आलंय.