नारायण राणे यांचा भाजपला गंभीर इशारा

मंत्रीमंडळ विस्तारावरुन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे संतप्त झालेत आहेत. त्यांनी  भाजपला स्पष्ट इशारा दिलाय. त्यामुळे आता भाजप काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Updated: Jan 19, 2018, 06:32 PM IST
नारायण राणे यांचा भाजपला गंभीर इशारा title=

मुंबई : मंत्रीमंडळ विस्तारावरुन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे संतप्त झालेत आहेत. त्यांनी  भाजपला स्पष्ट इशारा दिलाय. त्यामुळे आता भाजप काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी जाहीर केले होते की, राणे यांना योग्यवेळी स्थान दिले जाईल. मात्र, तीन तारखा काढूनही राणेंचा मंत्रीमंडळात समावेश झालेला नाही. यावरुन राणे यांना सवाल करण्यात आले असता, राणे यांनी भाजपला स्पष्ट शब्दात इशारा दिलाय. माझा अंत पाहू नका, अशा शब्दात राणेंनी हा इशारा दिलाय.

आज राणे यांनी कोकणातील राजापूर नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला. हा प्रकल्प शिवसेनेने पैशासाठी आणलाय. ते कोकणचा विनाश करत आहेत, असा आरोप राणे यांनी यावेळी केला. त्याचवेळी  मी आज संध्याकाळी ८ वाजताची मुख्यमंत्र्यांची वेळ मगितलीय आहे. अशोक वालम यांना कुठलं इंजेक्शन देण्यात येत होतं? त्यांना मारण्याचा कट शिवसेनेचा आहे का याची चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती राणे यांनी दिली.