NIA Raid : देशभरात विविध ठिकाणी NIA ने छापेमारी केलीय.. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थानमध्ये ही कारवाई सुरु आहे.. मुंबईच्या विक्रोळीतही एनआयने धाड टाकलीय.. मुंबईत 11 जुलै 2006 ला ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटातला (7/11 Railway Bomb Blast) आरोपी वाहिद शेखच्या विक्रोळीतल्या घरी ही धाड टाकण्यात आलीय. यावेळी वाहिद शेखच्या घराबाहेर पोलीस आणि आरोपीच्या वकिलात वाद झाला.
सहा तासानंतर घरात एन्ट्री
तब्बल सहा तासानंतर NIAची टीम वाहिद शेख याचा घरात शिरली. यादरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहिद शेख याच्या वकिला सोबत पोलिसांची बाचाबाची देखील झाली. त्यानंतर एनआयएची टीम अखेर वाहिद शेख यांच्या घरात शिरली. सध्या वाहिद शेख याची चौकशी त्याच्या घरात सुरू आहे.
पीएफआय संघटना प्रकरणात एनआयए देशभरात ठिकठिकाणी छापेमारी करत आहे. विक्रोळी पार्क साईट इथे वाहिद शेख याच्या घरी एनआयएचं पथक पहाटे पोहचलं. मात्र वाहिद शेख दरवाजाच उघडला नाही. जो पर्यंत नोटीस दाखवत नाही तो पर्यंत दरवाजा उघडनार नाही असा पवित्रा वाहित शेखने घेतला. त्यामुळे एनआयएचं पथक आणि पोलीस त्यांच्या घराबाहेर ठाण मांडून बसले.
अब्दुल वाहिद शेख रेल्वे बॉम्ब स्फोट प्रकरणी अटकेत होता. मात्र त्याची 2015 मध्ये निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर तो शिक्षक म्हणून काम करतोय. त्याने वकिलीचे शिक्षण घेतलं आहे. त्याच्या कुटुंबात पत्नी आणि दोन लहान मुलं आहेत.
वाहिदचे वकील इब्राहम हार्बट यांनी पोलिसांशी वाद घातला. कागदपत्रे नसल्याचे त्यानी सांगिलं. त्यामुळे आता एनआयए आणि पोलीस पुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.