मुंबई : वरळी-शिवडी-नाव्हाशेवा प्रकल्पाचे काम सुरु आहे. या प्रकल्पात वरळी, प्रभादेवी, एलफिन्स्टन, परळ, शिवडी भागातील हजारो रहिवाश्यांची घरे/ दुकाने बाधित होत आहेत. हे प्रकल्प बाधित मोठ्या संख्यने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 'शिवतीर्थ' या त्यांच्या निवासस्थानी जमले आहेत.
वरळी-शिवडी-नाव्हाशेवा प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे. मात्र, या प्रकल्पामध्ये वरळी, प्रभादेवी, एलफिन्स्टन, परळ, शिवडी या मराठी पट्ट्यातील अनेक घरे, दुकाने बाधित होत आहेत. सदर घरे व दुकाने स्थलांतरीत करताना प्रशासनाने स्थानिकांना कुठलीही नोटीस किंवा पूर्वकल्पना नाही असा आरोप बाधित रहिवाश्यांनी केला आहे.
प्रशासनाने स्थानिकांचे स्थलांतर करताना पूर्वकल्पना न दिल्याने गेल्या १०० वर्षांपासून येथे रहात असलेल्या हजारो कुटुंबावर बेघर होण्याचे सावट पसरले आहे. त्यामुळे या सर्व रहिवाश्यांनी एकत्र येत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याचे ठरवले.
त्याप्रमाणे वरळी, प्रभादेवी, एलफिन्स्टन, परळ, शिवडी भागातील हजारो रहिवाशी आपल्या हक्काच्या घरासाठी न्याय मागण्यासाठी मोठ्या संख्येने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी आले आहेत.