राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; येवल्यातून भुजबळ, श्रीवर्धनमधून तटकरेंच्या मुलीला उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.

Updated: Oct 2, 2019, 11:05 PM IST
राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; येवल्यातून भुजबळ, श्रीवर्धनमधून तटकरेंच्या मुलीला उमेदवारी title=

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसकडून बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये ७७ उमेदवारांचा समावेश आहे. शिवसेना, भाजप आणि काँग्रेसकडून यापूर्वीच उमेदवार याद्या जाहीर केल्या होत्या. त्यामुळे अनेकांचे डोळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीकडे लागले होते. 

यामध्ये बहुतांश विद्यामान आमदारांना संधी देण्यात आली आहे. बारामतीमधून अजित पवार, इंदापूरातून दत्तात्रय भरणे, येवल्यातून छगन भुजबळ आणि श्रीवर्धनमधून अदिती तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  नाशिकमध्ये भाजपमधून बंडखोरी करून आलेल्या माणिकराव कोकाटे यांना सिन्नर मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आले आहे. मात्र, आदित्य ठाकरे उभ्या असलेल्या वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादीने अद्याप उमेदवार दिलेला नाही.

तर पंढरपूरमधून भारत भालके, मुरबाडमधून प्रमोद हिंदुराव, कल्याण पूर्व मतदारसंघातून प्रकाश तरे यांना उमेदवारी देण्यात आली. 

मुंबईत दिंडोशी मतदारसंघातून आमदार विद्या चव्हाण, विक्रोळीतून नगरसेवक धनंजय पिसाळ, ठाण्याच्या मुंब्रा-कळवा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांनी संधी देण्यात आली आहे. तर बहुचर्चित कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपच्या राम शिंदे यांच्याविरोधात रोहित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.