राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, दिग्गज नेत्याचा पक्षाला टाटा-बायबाय

"मला 16 वर्ष सन्मान दिला आणि मार्गदर्शन केलं यासाठी मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आभारी आहे."

Updated: Nov 24, 2022, 06:26 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, दिग्गज नेत्याचा पक्षाला टाटा-बायबाय title=

मुंबई : राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) वरिष्ठ नेत्याने तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांचे अत्यंत जवळच आणि विश्वासू असलेले माजिद मेनन (Majid Menon) यांनी पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजनीामा दिलाय. माजिद मेनन यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिलीय. दरम्यान आता मेनन यांची पुढची भूमिका काय असणार याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. (ncp nationalist congress party former rajya sabha mp and senior leader majid menon resign know what exactly reason)

ट्विटमध्ये काय म्हटलंय? 

"मला 16 वर्ष सन्मान दिला आणि मार्गदर्शन केलं यासाठी मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आभारी आहे. मी वैयक्तिक कारणामुळे पक्ष सोडतोय. पवार साहेबांना आणि पक्षाला शुभेच्छा", असं ट्विट माजिद मेनन यांनी केलंय. 

माजीद मेनन यांच्याबाबत थोडक्यात

माजीद मेनन हे पेशाने वकील आहेत. मेनन राष्ट्रवादीकडून 2014 ते 2020 या कालावधीत राज्यसभेचे खासदार होते. विशेष आणि उल्लेखनीय बाब म्हणजे मेनन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं. तेव्हा मेनन राजकीय भूकंप घडवणार असल्याचं म्हटलं जात होतं.  मात्र तसं काही झालं नाही. पण आता राजीनामा दिल्यानंतर मेनन नव्या इनिंगला सुरुवात करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.