दीपक भातुसे / मुंबई : बलात्काराचे आरोप झालेले मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका (NCP's support for Dhananjay Munde) घेतली आहे. मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची गरज नसल्याची पक्षाची भूमिका आहे.
धनंजय मुंडेंच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका घेतली आहे. तसे पक्षाच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे. रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत राष्ट्रवादीने तातडीची बैठक घेतली. या बैठकीत अन्य विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी धनंजय मुंडे यांच्या पाठिशी उभे राहण्याचे ठरविले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तशी खलबते झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची गरज नसल्याची पक्षाची भूमिका आहे. असे आरोप झाल्याने राजीनामा घेतला तर तोच पायंडा पडेल अशी पक्षाची धारणा आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. उद्या कुणीही कोणाविरुद्ध खोटे आरोप करेल तर राजीनामा घ्यायचा का? याबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या तरुणीने बलात्काराचे आरोप केल्यानंतर विरोधक सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अखेर यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसनेही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे. धनंजय मुंडे यांनी याबाबत खुलासा केला आहे. आम्ही कोणीही याप्रकरणात हस्तक्षेप करणार नाही.
भाजप वेगवेगळ्या मागण्या करत आहेत, भाजपचे हे काम आहे, पण मंत्रिमंडळात फेरबदलाची आवश्यकता नाही, वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, बलात्कराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सोशल मीडियावर आपली बाजू मांडली. तसेच धनंजय मुंडे यांनी आपल्यावरील फेटाळून लावले होते.