दोन्ही प्रकरणात सरकार हस्तक्षेप करणार नाही - जयंत पाटील

धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर जंयत पाटील यांची प्रतिक्रिया

Updated: Jan 14, 2021, 12:46 PM IST
दोन्ही प्रकरणात सरकार हस्तक्षेप करणार नाही - जयंत पाटील title=

मुंबई : जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपावर ही प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, 'तक्रारीची शहानिशा केल्याशिवाय निष्कर्ष काढता येणार नाही. धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपचे काही नेते समंजस आहेत, चंद्रकात पाटील काय भूमिका मांडतायत ते दिसून येतं आहे. मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाही.'

धनंजय मुंडे यांनी हायकोर्टात याबाबत आपला अर्ज देखील सादर केलेला आहे. परिस्थितीचा योग्य तो आढावा योग्य स्तरावर घेतली जाईल. गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांच्या जावयाला झालेल्या अटकेवर देखील जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतील सरकार विरोधकांना नामोहरम करण्यासाठीच आहे .राजकीय अभिनेषातून कारवाई होते आहे. जावई आहेत म्हणून सास-यांने काही करावं असं वाटत नाही. सास-यावर काही परिणाम होणार नाही. दोन्ही प्रकरणात नि:पक्ष चौकशी व्हावी, आम्ही हस्तक्षेप करणार नाही. असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.