दुसऱ्यांची पिल्ल वाईट, मग यांनी काय श्रावणबाळ जन्माला घातला आहे?

‘टाचणी’ तयार आहे, फक्त योग्य वेळ येऊन द्या

Updated: Oct 25, 2020, 10:49 PM IST
दुसऱ्यांची पिल्ल वाईट, मग यांनी काय श्रावणबाळ जन्माला घातला आहे?

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंची बेडकाशी तुलना केली. याला प्रत्युत्तर देत 'यांनी काय श्रावणबाळ जन्माला घातला आहे का?', असा सवाल नितेश राणेंनी विचारला आहे. 

नितेश राणेंनी ट्विट करून,'बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखानी “Vaccine” घेतलेली दिसते..जास्तच हवा भरलेली आज.. किती आव.. 'टाचणी’तयार आहे.. फक्त योग्य वेळ येऊन दया.., असं एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं,'दुसऱ्यांची 'पिल्ल' वाईट.. मग यांनी काय त्या DINO च्या खुशित नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा "श्रवणबाळ" जन्माला घातला आहे का? इतकी खुम खुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पुलिस वर कुठला ही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन दया.. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!' 

नारायण राणेंबद्दल काय म्हणाले होते मुख्यमंत्री? बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत. काही जणांना इंजेक्शन द्यावं लागतं. काही जणांना तर माणसाचं नाही, तर गुरांचं इंजेक्शन द्यावं लागतं. काही जण तर अशी बेडक आहेत. तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितलं. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही,” अशी टीका ठाकरे यांनी केली होती.