कर्जमाफीनंतर मध्यावधी निवडणुकीची चर्चा, मुनगंटीवार म्हणतात...

३१ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. 

Updated: Jun 6, 2017, 06:19 PM IST
कर्जमाफीनंतर मध्यावधी निवडणुकीची चर्चा, मुनगंटीवार म्हणतात...  title=

मुंबई : ३१ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यानंतर भाजप राज्यात मध्यावधी निवडणुकीला सामोरं जाईल अशा चर्चा सुरु आहेत. पण या मध्यावधी निवडणुकांच्या शक्यता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फेटाळून लावल्या आहेत.

शेतकरी कर्जमाफीनंतर सरकार मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाईल हा गैरसमज आहे. १९९९ ला असाच प्रयोग झाला होता तेव्हा काय झालं होतं माहित आहे, असं मुनगंटीवार म्हणालेत.

शेतकरी संपाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकाकी पडले नाहीत, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे. एखाद्या गाडीमध्ये अनेकांकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ते सगळे स्टेरिंगवर बसत नाहीत. त्यातील एकच जण स्टेरिंगवर बसून गाडी चालवतो. त्याचप्रमाणे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते तोडगा काढत आहेत, असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं आहे.