लक्ष द्या! मुंबईकरांनो डिसेंबर महिन्यातील 'हे' दिवस पाणीपुरवठा नाही

  Mumbai बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील गावडे चौक, सेनापती बापट मार्ग येथे अस्तित्वात असलेल्या ब्रिटिशकालीन १४५० मिली मीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जल वाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम दिनांक २ आणि ३ डिसेंबर २०२० रोजी हाती घेण्यात येणार आहे. 

Updated: Nov 27, 2020, 08:15 PM IST
लक्ष द्या! मुंबईकरांनो डिसेंबर महिन्यातील 'हे' दिवस पाणीपुरवठा नाही
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई :  Mumbai बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील गावडे चौक, सेनापती बापट मार्ग येथे अस्तित्वात असलेल्या ब्रिटिशकालीन १४५० मिली मीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जल वाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम दिनांक २ आणि ३ डिसेंबर २०२० रोजी हाती घेण्यात येणार आहे. 

२ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणारं हे काम ३ डिसेंबर २०२० रोजी दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. परिणामी सदर कालावधीत ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नसल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. तर, काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

ज्या परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही, त्या परिसरांची नांवे व संबंधित तपशील पुढीलप्रमाणे आहे.... 

१. जी दक्षिण
बुधवार दिनांक २.१२.२०२० रोजी दुपारी २ ते ३ (डिलाईल रोड);
दुपारी ३.३० ते सायं. ७
(सिटी सप्लाय)
परिसर:- ना. म. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ, प्रभादेवी, जनता वसाहत, आदर्श नगर, एलफिस्टन (लोअर परळ) या परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.

२. जी उत्तर
बुधवार दिनांक २.१२.२०२० रोजी सायं. ४ ते ७; तसेच सायं. ७ ते रात्री १०
परिसर:- एलफिस्टन (लोअर परळ), काकासाहेब गाडगीळ मार्ग, सेनापती बापट मार्ग, गोखले मार्ग, वीर सावरकर मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टि. एच. कटारीया मार्ग, कापड बाजार, माहीम (पश्चिम) पूर्ण परिसर, माटुंगा (पश्चिम) आणि दादर (पश्चिम) परिसर या परिसरांमध्ये पूर्णतः पाणीपुरवठा होणार नाही
............
३. जी दक्षिण
गुरुवार दिनांक ३.१२.२०२० रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ७.४५ (डिलाईल रोड)

परिसर:- ना. म. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग या परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तसंच ज्या परिसरांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे, त्या परिसरांची नांवे व संबंधित तपशील पुढीलप्रमाणे आहे

जी दक्षिण
गुरुवार दिनांक ३.१२.२०२० रोजी पहाटे ४ ते सकाळी ७ (क्लार्क रोड)
परिसर:- धोबी घाट, सातरस्ता या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. 

 

शहरातील पाणीपुरवठ्याची ही व्यवस्था पाहता नागरिकांनी पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितका साठा करत, याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.