राज्यात घटनात्मक पेच, काँग्रेस आघाडीने वेळेत शिवसेनेला पाठिंबा न दिल्याने तिढा

शिवसेनेला आघाडीने पाठिंबा देण्याचे मान्य केले. मात्र, शिवसेनेला पाठिंबा देण्याची पत्रे मिळालेली नाहीत.  

Updated: Nov 11, 2019, 08:32 PM IST
राज्यात घटनात्मक पेच, काँग्रेस आघाडीने वेळेत शिवसेनेला पाठिंबा न दिल्याने तिढा title=
संग्रहित छाया

मुंबई : शिवसेनेला काँग्रेस आघाडीने पाठिंबा देण्याचे मान्य केले. मात्र, त्यांना पाठिंबा देण्याची पत्रे मिळालेली नाहीत. त्यामुळे शिवसेनेला पाठिंब्यासाठी जे संख्याबळ लागते ते लेखी स्वरुपात राज्यपालांना देता आलेले नाही. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. दरम्यान, शिवसेनेकडून दोन दिवसांची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. मात्र, राज्यपालांनी ही वेळ वाढवून देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला असून महाराष्ट्र राज्यात राष्टपती राजवट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

दरम्यान, उद्या मुंबईत काँग्रेस नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर एक समाना कार्यक्रम ठरवून शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. कारण शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला असला तरीही पाठिंब्याचं पत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिलेले नाही. तसेच राजभवनाकडूनही अशी पत्र मिळालेली नाहीत, असे सांगण्यात आले. त्यामुळे राज्यपालांनी यासाठीची वेळ वाढवून दिली नाही. त्यामुळे दावा जरी कायम असला तरीही शिवसेनेला दिलेली मुदत संपली आहे. 

शिवसेना दिलेल्या वेळेपर्यंत सरकार स्थापन करण्यासाठी जे आमदारांचे संख्याबळ लागते ते शिवसेना सिद्ध करु शकलेली नाही. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा तिढा अद्याप कायम असल्याचे पुढे येत आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंब्यासाठीची पत्र पाठवली नाहीत. 

दरम्यान, आम्ही सत्तास्थापनेसाठी वेळ वाढवून मागितली, मात्र राज्यपालांनी ती फेटाळली आहे. परंतु आमचा सत्तास्थापनेचा दावा फेटाळलेला नाही, अशी माहिती शिवसेना युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे जरी राष्ट्रपती राजवट लागली तरी सत्ता स्थापनेसाठीचे संख्याबळ शिवसेनेकडे झाले तर ते पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा दावा करु शकतात, अशी चर्चा आहे.