ओला उबेर चालकांचा आजपासून बेमुदत संप

  आज ओला आणि उबेरचा संप आहे.... चांगलं उत्पन्न मिळावं या मागणीसाठी ओला आणि उबेर चालकांनी आजपासून बेमुदत संपाची हाक दिलीय. 

Updated: Mar 19, 2018, 09:59 AM IST
ओला उबेर चालकांचा आजपासून बेमुदत संप title=

मुंबई :  आज ओला आणि उबेरचा संप आहे.... चांगलं उत्पन्न मिळावं या मागणीसाठी ओला आणि उबेर चालकांनी आजपासून बेमुदत संपाची हाक दिलीय. 

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेनं हा संप पुकारलाय. मुंबईत ओला, उबेरचे तीस हजार चालक आहेत. मुंबईकरांना याचा फटका बसणार आहे. 

अनेक मुंबईकर शेअर ओला किंवा उबेरनं ऑफिसला जातात.... हा संप लक्षात घेता मुंबईकरांच्या सोईसाठी अतिरिक्त बसेस, आणि टॅक्सींची सोय करण्यात आलीय.... तसंच नव्यानं सुरू झालेल्या हायब्रीड एसी बसचा पर्यायही मुंबईकरांसाठी उपलब्ध असणार आहे.