धक्कादायक! ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण

कोरोना झपाट्यानं फोफावतोय; सावध व्हा....  

Updated: Apr 20, 2020, 06:39 PM IST
धक्कादायक! ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोरोना व्हायरसचा झपाट्याने प्रसार होत असल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहेत. अतिशय झपाट्याने पसरणाऱ्या Coronavirusच्या या विळख्यात आला पत्रकारही आले आहेत. आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यामागोमाग आता घटनास्थळांवर जात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. 

मुंबईतील ५३ पत्रकारांना कोरानाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लागण झालेल्यांमध्ये ४१ रिपोर्टर तर १२ कॅमेरामनचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर केंद्रं आणि राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. मात्र अत्यावश्यक सेवेत मोडत असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे रिपोर्टर आणि कॅमेरामन, तसेच प्रिंट माध्यमांचे कॅमेरामन रिपोर्टींगसाठी मुंबईत ठिकठिकाणी, कोरोनाबाधित ठिकाणांवर कामानिमित्त फिरत होते.

ऑन फिल्ड रिपोर्टींग करणाऱ्या या पत्रकारांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. त्यानुसार मुंबईतील १६७ पत्रकारांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली. यातील ५३ पत्रकारांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या ५३ जणांना पालिकेकडून विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांना येत्या काळात क्वारंटाईन करण्यात येणार आहे. यामध्ये काही पत्रकार हे इंन्स्टीट्यूशनल क्वारंटाईन असतील किंवा काहींना होन क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. 

दरम्यान, कोरोनाग्रस्त पत्रताराच्या संपर्कात आल्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यासुद्धा १४ दिवसांसाठी क्वारंटाईन झाल्या आहेत. 

 

कामाचा भाग आणि जबाबदारी म्हणून पत्रकार वर्ग सध्या मुंबईच्या विविध भागांमध्ये स्वत:चा जीव धोक्यात झालून वार्तांकन करत आवश्यक ती माहिती देत आहेत. पण, या साऱ्यामध्ये मात्र कशाचीही तमा न बाळगता लॉकडाऊनचे नियम मोडणाराही एक असा वर्ग आहे, जो परिस्थिती आणखी बिघडवत आहे. त्यामुळे किमान इतरांचा जीव धोक्यात घालू नका. घरी राहा, सुरक्षित राहा.