अँकर अर्पिता तिवारीच्या हत्या प्रकरणी एकाला अटक

तब्बल महिन्याभरानंतर मालवणी पोलिसांनी अँकर अर्पिता तिवारीच्या हत्या प्रकरणाचं कोडं सोडवलंय. अर्पिताच्या प्रियकराचा या हत्येत हात असल्याचं समजतंय. या प्रकरणी अमित हाजरा नावाच्या तरूणाला अटक करण्यात आलीय. 

Updated: Jan 16, 2018, 03:31 PM IST
अँकर अर्पिता तिवारीच्या हत्या प्रकरणी एकाला अटक title=

अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : तब्बल महिन्याभरानंतर मालवणी पोलिसांनी अँकर अर्पिता तिवारीच्या हत्या प्रकरणाचं कोडं सोडवलंय. अर्पिताच्या प्रियकराचा या हत्येत हात असल्याचं समजतंय. या प्रकरणी अमित हाजरा नावाच्या तरूणाला अटक करण्यात आलीय. 

काय आहे प्रकरण?

11 डिसेंबरला मालाडच्या इमारतीतून पडून 24 वर्षीय अर्पिता तिवारीचा मृत्यू झाला होता. बाथरूमच्या खिडकीतून तिचा मृतदेह फेकण्यात आला होता. बाथरूमचा दरवाजा आतून बंद असल्याने ही हत्या होती की आत्महत्या असा प्रश्न पोलिसांना पडला होता. अर्पिता ही टीव्ही अँकर असून आपली मुलगी आत्महत्या करूच शकत नाही असा दावा अर्पिताच्या कुटुंबियांनी केला होता. 

अमित हाजरावरचा संशय बळावला

अर्पिताच्या मृत्यूच्या रात्री घरात असलेला तिचा प्रियकर पंकज जाधव, त्याचा मित्र अमित हाजरा इतर दोघे आणि नोकराचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय. या सगळ्यांची लाय डिटेक्टर आणि टेस्ट पॉलिग्राफ चाचणीही करण्यात आली. पोलिसांचा अमित हाजरावरचा संशय चाचणीनंतर बळावला. मात्र तो गुन्हा कबूल करत नव्हता. अखेर पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच अमित हाजराने गुन्हा कबूल केलाय. 

पोलीस कोठडी

अमितची रवानगी 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आलीय. पण अर्पिताची हत्या का करण्यात आली याचं उत्तर मात्र अजूनही अनुत्तरीतच आहे.