मुंबई : ख्यातनाम माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर हिच्या नावानं बनावट ट्वीटर अकाऊंट उघडणा-या नितीन शिसोदेला 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 39 वर्षांचा नितीन शिसोदे इंजिनिअर असून, तो सेंकड हँड लॅपटॉप आणि संगणकाचा व्यवसाय करतो.
साराच्या नावानं बनावट ट्वीटर अकाऊंट उघडणं तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणं, या गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आलीय. त्याच्याकडून लॅपटॉप, 2 मोबाईल फोन, राऊटर आणि संगणकाचे भाग जप्त करण्यात आलेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वादग्रस्त आयपी एड्रेस हा नितीन शिसोदे याच्या राऊटरचा असून या संदर्भात अधिक तपासासाठी पोलीस फॉरेन्सिक लॅबची मदत घेणार आहेत. सारा तेंडुलकरच्या नावानं फेक अकाऊंट तयार करण्यात आल्याची तक्रार तेंडुलकरच्या पीएनं केली होती. त्यानुसार पोलिसांनी मरोळ मिलिटरी रोड परिसरातून शिसोदेला अटक केली.