मुंबई ३.५ लाखांपेक्षा जास्त घरे वापराविना, ग्राहक नसल्याने साचलेय धूळ

प्रत्येकालाच स्वतःचं घरं हवं असतं... पण गेल्या काही वर्षांत घरांच्या किंमती एवढ्या वाढल्यात की, घरं विकत घेणं परवडेनासं झालंय. त्यामुळंच मुंबई महानगर प्रदेशात तब्बल साडेतीन लाखांहून अधिक घरं ग्राहकांअभावी पडून आहेत. 

Updated: Nov 16, 2017, 05:45 PM IST
मुंबई ३.५ लाखांपेक्षा जास्त घरे वापराविना, ग्राहक नसल्याने साचलेय धूळ title=

मुंबई : प्रत्येकालाच स्वतःचं घरं हवं असतं... पण गेल्या काही वर्षांत घरांच्या किंमती एवढ्या वाढल्यात की, घरं विकत घेणं परवडेनासं झालंय. त्यामुळंच मुंबई महानगर प्रदेशात तब्बल साडेतीन लाखांहून अधिक घरं ग्राहकांअभावी पडून आहेत. 

५ हजार ६२० प्रकल्पाची नोंद 

मुंबई म्हणजे मायानगरी. देशाची आर्थिक राजधानी.  इथं प्रत्येकाला वाटतं की, आपलं हक्काचं घर असावं. पण घरं कमी आणि माणसं जास्त अशी इथली स्थिती. पण गेल्या काही वर्षांत मुंबई, ठाणे कल्याण डोंबिवली परिसरात तब्बल तीन लाखापेक्षा जास्त घरं रिकामी पडून असल्याची आकडेवारी समोर आलीय. महारेराकडून मिळालेल्या गृहनिर्माण अहवालानुसार,महारेराकडं एमएमआर भागात ५ हजार ६२० प्रकल्प नोंद आहेत.

 ४५ टक्के घरे रिकामी

त्यामध्ये घरांची संख्या ९ लाख १६ हजार ३९८ इतकी आहे.त्यात विक्री आणि बुकींग झालेली घरं ५ लाख ५२ हजार इतकी आहेत. तर तब्बल ३ लाख ६४ हजारापेक्षा जास्त घरं रिकामी आहेत. म्हणजे जवळपास ४५ टक्के घरे रिकामी आहेत.

सरकार मात्र घरांसाठी अजूनही मागणी असल्याचा दावा करतंय.. तर गृहनिर्माण धोरणातल्या चुका आणि आर्थिक धोरणं याचा हा परिणाम असल्याचं अभ्यासक सांगतात.

मुंबई आणि परिसरात घरं बांधली जातात. पण ती विकली जात नाहीत, असं चित्र यानिमित्तानं समोर आलंय. गेल्या काही काळातल्या आर्थिक घडामोडींचा परिणाम गृहनिर्माण क्षेत्रावर झालेला दिसतोय.