परमबीर सिंग याचिका : कोर्टाने मागवली पोलीस डायरी, त्यात काय निघालं ?

डायरीत तक्रार नोंद नसल्याचे स्ष्ट

Updated: Mar 31, 2021, 05:27 PM IST
परमबीर सिंग याचिका : कोर्टाने मागवली पोलीस डायरी, त्यात काय निघालं ? title=

मुंबई : परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर आज कोर्टात सुनावणी झाली. यावेळी एफआयआर ही प्राथमिक पायरी आहे. गुन्हा नोंद झाला की त्याची चौकशी होते मग चार्जशीट दाखल होते. आणि त्यानंतर कोर्टात केस येते असे कोर्टाने म्हटले. यावर उत्तर देताना मलबार हिल पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार दिली आहे असल्याचे परमबीर सिंग यांच्या वकील जयश्री पाटील (सदावर्ते ) यांनी सांगितले. त्याची कॉपी जोडली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर कोर्टाने मलबार पोलीस ठाण्यातील डायरी मागवून घेतली. पण या डायरीत तक्रार नोंद नसल्याचे स्ष्ट झाले. 

कोर्टाने एडवोकेट जयश्री पाटील यांना त्यांच्या पिटीशनबाबत म्हणण विचारले. यावेळी पाटील यांनी आपल्या पिटीशनमध्ये नमुद केलेले मुद्दे वाचून दखविले.
त्यात काही फॉलोअप किंवा दखल घेतली गेली का ? असा प्रश्न कोर्टाने त्यांना विचारला. यावर उत्तर देताना, "मी त्यांना माझे स्टेटमेंट 4 - 5 दिवसांनी रेकॉर्ड करायला सांगितले पण पोलिसांनी नकार दिल्याचे' त्या म्हणाल्या.

मलबार हिल पोलीस स्टेशन मधून स्टेशन डायरी आणली मात्र त्यात नोंद नव्हती. यावर पोलीस डायरीत नोंद का नाही ? असा प्रश्न कोर्टाने विचारला. यावर उत्तर देताना मला माहित नाही असे त्या म्हणाल्या. 
मलबार हिल पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार दिली आहे , मात्र त्याची नोंद स्टेशन डायरीत नाही असे वकील जयश्री पाटील (सदावर्ते ) यांनी सांगितले.