परमबीर सिंग हे विरोधी पक्षाचे महत्त्वाचे हत्यार- संजय राऊत

 परमबीर सिंग यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय. 

Updated: Mar 22, 2021, 11:02 AM IST
परमबीर सिंग हे विरोधी पक्षाचे महत्त्वाचे हत्यार- संजय राऊत title=

नवी दिल्ली : परमबीर सिंग हे (Parambir Singh) विरोधी पक्षाचे महत्त्वाचे हत्यार  (Parambir is Weopon of Opposition)आहे. परमबीर सिंग यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलंय. विरोधकांच्या तोफामध्ये गोळे नसल्याचे ते म्हणाले. परमबीरसिंह यांनी केलेल्या आरोपानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केले. या पार्श्वभुमीवर राऊत बोलत होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसनं आरोपात तथ्य नसल्याचं निश्चीत केलंय. केवळ आरोप झाल्यामुळे राजीनामा कसा द्यायचा ? सगळ्यांचा राजीनामा घेत बसायचं का ? रिबेरो यांनी तपास करावा. राजीनामा घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत. ज्या आरोपांचा धुरळा उडवला आहे, त्यात संभ्रम निर्माण केला जातोय.सत्य आणि तथ्य यात अंतर आहे. सरकारच्या प्रतिमेची आम्हाला चिंता असल्याचे राऊत म्हणाले.

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. उद्धव ठाकरे पदावर आहेत तोपर्यंत चौकशी निष्पक्ष होईल. मुख्यमंत्र्यांचा निर्णय तेच घेतील असेही ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्याची मागणी केली होती. याबद्दल बोलताना, राष्ट्रपती राजवट संदर्भात प्रकाश आंबेडकर बोलत असतील तर त्यांनी पुन्हा एकदा अभ्यास करावा असे ते म्हणाले. जर राष्ट्रपती राजवट लावला जात असेल तर केंद्र सरकार बर्खास्त करायला पाहीजे.राज्याच्या अधिकारावर घाला आहे

एखाद्या फौजदाराला घेण्याचं काम मुख्यमंत्र्यांचं नाही. सिस्टीम मधून नियुक्ती झालीय. कोणीही कितीही आरोप केले तरी महाराष्ट्र सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करतील. केंद्रात कोणाची खातं कोण चालवतंय हे पण एकदा पाहायला पाहीजेत.एखाद्या अधिका-याला बदलण्याचा अधिकार सरकारला आहे.

कोण कोणाच्या गाड्या वापरल्या हे चौकशीतून दिसून येईल. अधिकाराचा अतेरिकी वापर करून राष्ट्रपती शासन लावत असेल तर आम्ही त्यांना झोपेतून जागे करू. केंद्रीय तपास यंत्रणा च्या माध्यमातून राज्याचा अवमान करायचा असेल तर जनता माफ करणार नाही असे राऊत म्हणाले. 

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी कांग्रेसच्या पक्ष श्रेष्ठी सोबत चर्चा केलीय. कॉंग्रेसला परमबीर सिंग आणि सचिन वाझे प्रकरणातील सर्व माहिती दिली गेलीय असेही ते म्हणाले.