परमबीरसिंग यांच्या वकिलांनी कोर्टात काय बाजू मांडली ?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु 

Updated: Mar 31, 2021, 04:11 PM IST
परमबीरसिंग यांच्या वकिलांनी कोर्टात काय बाजू मांडली ?

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग (Parambir Singh) यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी सुरु आहे. यावेळी परमबीर सिंग यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली. एका पोलीस आयुक्तांने राज्याच्या गृहमंत्री यांच्यावर आरोप केले हे गंभीर आहेत. या अगोदर असेकाही ऐकीवात नाही. महिन्याला 100 करोड म्हणजे वर्षला 1200 करोड आणि सरकार 5 वर्षे असते म्हणजे 6000 करोडचा आरोप आहे. 

जर एका मंत्र्यांवर असा आरोप आहे तर किती जण यात सहभागी आहेत याची चौकशी व्हायला हवी असे परमबीर सिंग यांच्या वकिलांनी म्हटले. 

यावर उत्तर देताना उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. तुमचे राज्याच्या पोलिसांवर विश्वास नाही का ? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. एफआयआर ही प्राथमिक पायरी आहे. गुन्हा नोंद झाला की त्याची चौकशी होते मग चार्जशीत दाखल होते आणी त्यानंतर कोर्टात येते असे कोर्टाने म्हटले. 

जर पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांवर आरोप असेल तर कोण चौकशी करणार असा प्रश्न कोर्टाने उपस्थि केला. गुन्हा का नोंदवला नाही ? असेही कोर्टाने विचारले.

यावर उत्तर देताना मलबार हिल पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार दिली आहे. त्याची कॉपी जोडली असल्याचे जयश्री पाटील (सदावर्ते ) यांनी सांगितले. 

यानंतर मलबार हिल पोलीस स्टेशनची स्टेशन डायरी कोर्टात मागवण्यात आली आहे. 4 वाजेपर्यंत स्टेशन डायरी मागवा असे कोर्टाने म्हटले.

सहाय्यक पोलीस आयुक्त पाटील यांनी कोणतेही एफिडेव्हिडं कोर्टाला दिले नसल्याचे कोर्टाने म्हटले. दरम्यान परमबीर सिंग यांच्या वकिलांकडून आजची सुनावणी उद्या ठेवावी अशी विनंती करण्यात आली आहे.