मुंबई: केंद्र व राज्य सरकारच्या हस्तक्षेपामुळे काही दिवसांपूर्वीच कमी झालेले पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढत आहेत. रविवारी जवळपास सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. काल मध्यरात्रीपासून मुंबईत पेट्रोल व डिझेलचे दर पुन्हा वाढले. पेट्रोल ६ तर डिझेल २० पैशांनी महागले. त्यामुळे आता पेट्रोल व डिझेलची किंमत अनुक्रमे ८८.१८ आणि ७९.०२ इतकी झाली आहे.
तत्पूर्वी शुक्रवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे १८ पैसे व ३१ पैशांची वाढ झाली होती. त्यामुळे आता हे दर पुन्हा आपल्या मूळ पदावर येणार का, अशी चिंता सामान्यांना सतावत आहे.
Petrol and diesel prices in #Delhi are Rs 82.72 per litre (increase by Rs 0.6) and Rs 75.38 (increase by Rs 0.19) respectively. Petrol and diesel prices in #Mumbai are Rs 88.18 per litre (increase by Rs 0.6) and Rs 79.02 per litre (increase by Rs 0.20) respectively. pic.twitter.com/f11tEU44hr
— ANI (@ANI) October 14, 2018