पेट्रोलच्या दरात आज पुन्हा वाढ, नांदेडमध्ये सर्वाधिक दर

पेट्रोल पुन्हा महागलं

Updated: Sep 18, 2018, 12:09 PM IST
पेट्रोलच्या दरात आज पुन्हा वाढ, नांदेडमध्ये सर्वाधिक दर

मुंबई : पेट्रोलच्या दरात आज पुन्हा एकदा १० पैशाची वाढ झाली आहे. तर डिझेलही ९ पैशांनी महागलं आहे. त्यामुळे आता पेट्रोलच्या एका लीटरसाठी मुंबईत ८९ रुपये ५४ पैसे तर डिझेलच्या एका लीटरसाठी ७८ रुपये ४२ पैसे मोजावे लागत आहेत. तिकडे नांदेडच्या धर्माबाद तालुक्यात पेट्रोलचा दर ९२ रुपये २५ पैसे झाला आहे. पेट्रोलियम पदार्थांवर देशात सर्वाधिक कर महाराष्ट्रात लावण्यात येतो.  राज्यात पेट्रोलच्या मूळ किंमतीवर तब्बल ३९ % कर लादण्यात आला आहे. त्यामुळे दर कमी करायचे असतील तर राज्यसरकारनंच पावलं उचलणं गरजेचं आहे.

पाहा आजचे दर

लातूर
पेट्रोल - 90.40
डिझेल - 78.08

भंडारा
पेट्रोल - 89.94 
डिझेल - 77.64

गोंदिया
पेट्रोल - 90.60 
डिझेल - 78.27 

सातारा
पेट्रोल - 90.00
डिझेल - 77.67

नांदेड 
पेट्रोल 91.10
डिझेल 78.75

जळगाव 
पेट्रोल 90.49
डिझेल 78.14

नंदुरबार
पेट्रोल - 90.79

चंद्रपूर
पेट्रोल - 89.57
डिझेल - 77.29

सोलापूर
पेट्रोल - 90.18
डिझेल - 79.10