शिवसेना-भाजप युतीत पितृपक्षाचा खोडा ?

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी घटस्थापनेला युतीचा घडा फुटला होता.

Updated: Sep 24, 2019, 04:29 PM IST
शिवसेना-भाजप युतीत पितृपक्षाचा खोडा ? title=

मुंबई : युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आणि ती घटस्थापनेपर्यंत अंतिम टप्प्यातच राहणार आहे. नवरात्रीचे घट बसेपर्यंत युतीचे घट काही बसणार नाहीत. कारण युती जाहीर करण्यात अडसर आहे तो पितृपक्षाचा. आता युतीची चर्चा ही फक्त मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यातच सुरू आहे. पण २९ तारखेपर्यंत कुठलीही घोषणा होणार नाही. तोपर्यंत सुरू राहील तो फक्त टाईमपास आणि डायलॉगबाजी.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळीही हेच झालं. युतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ पितृपक्ष संपेपर्यंत संपलं नाही. आणि घटस्थापनेला युतीचा घडा फुटला.
  
आता पक्षांमध्ये काही जागा वगळता कुठलाही तिढा नाही, युतीसाठी शिवसेनेनं भाजपशी केव्हाच जुळवून घेतलंय. अजून उमेदवार जाहीर नाहीत, कुंपणावरचे अजूनही अस्वस्थ आहेत. पण छे.... पितृपक्ष संपल्याशिवाय युतीची घोषणा नाही म्हणजे नाही.