न्यू ईअर सेलिब्रेशनचा प्लान करताय, मग हे पाहाच...

जाणून घ्या, मुंबईत कशी सुरु आहे नववर्षाच्या स्वागताची तयारी...

Updated: Dec 18, 2019, 11:05 PM IST
न्यू ईअर सेलिब्रेशनचा प्लान करताय, मग हे पाहाच...  title=

नेहा सिंह, झी २४ तास, मुंबई : न्यू इअर पार्टीसाठी मुंबई सज्ज झालीय. मुंबई तयार होतेय नव्या वर्षाच्या स्वागतासाठी... हॉटेल्स, पब्ज आणि डिस्कोची पॅकेज लिस्ट तयार झालीय. 

हॉटेल ललितमध्ये ओपन लॉन, पूल पार्टी, डीजे नाईटसह फॅमिली डिनर करता येणार आहे. त्यासाठी ३ हजार ते ६० हजारपर्यंत पैसे मोजावे लागणार आहेत.

हॉटेल ग्रैंड हयातमध्ये न्यू इअर पार्टीसाठी १३ हजार केवळ एन्ट्री फी आहे. मुंबईमध्ये अडीचशेपेक्षा जास्त न्यू ईअर पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलंय. क्लब पार्टी, हॉटेल पार्टी, बँक्वेट हॉल, लाईव्ह कॉन्सर्ट, एस्सेल वर्ल्ड, इमेजिका, वॉटर किंग्डममध्ये पार्टी करता येईल.

नव्या वर्षाचं हसत हसत स्वागत करायचं असेल तर स्टँडअप कॉमेडी शोही सज्ज आहेत. तुमच्या मूड आणि खिशानुसार न्यू ईअरचं प्लॅनिंग करा....