मोदींच्या आरोपांनी काँग्रेस बिथरली, उद्या राज्यभरात करणार आंदोलन

काँग्रेसने आंदोलनाची घोषणा केल्यानंतर भाजपनेही दिला हा इशारा

Updated: Feb 8, 2022, 03:25 PM IST
मोदींच्या आरोपांनी काँग्रेस बिथरली, उद्या राज्यभरात करणार आंदोलन title=

मु्ंबई  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत आणि आज राज्यसभेत काँग्रेसवर घणाघाती आरोप केले. यानंतर आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात आंदोलन पुकारलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकरार परिषद घेत आंदोलनाची घोषणा केली. पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती देशाची असते, त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला, याचं मनाला तीव्र दु:ख झालं आहे, अशी भावना नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केली. 

पंतप्रधानपदावर बसलेली व्यक्ती अजूनही भाजपची प्रचारक म्हणून वागत आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, भाजप आणि पंतप्रधानांनी जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. 

देशाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्राने केलं आहे, गुजरातमध्ये भूकंप आला तेव्हा महाराष्ट्राने सगळ्यात जास्त मदत केली, बाहरुन आलेल्या अनेकांना महाराष्ट्राने मोठं केलं, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

त्यामुळे राज्यातील भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, उद्या भाजपच्या सर्व कार्यालयासमोर आम्ही 'महाराष्ट्राची माफी मागावी' असे फलक घेऊन उभे राहणार असल्याची माहीती नाना पटोले यांनी दिली आहे.' 

राष्ट्रपातींच्या अभिभाषणावर चर्चा होते तेव्हा विरोधकांच्या आरोपांचं खंडन करुन सरकारने काय केलं हे सांगायचं असतं, एकमेकांची खिल्ली उडवायची नसते, असं सांगत नाना पटोले यांनी भाजपचे राज्यातील नेते समर्थन करत असतील तर ते महाराष्ट्र द्रोही आहेत, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली आहे. 

केंद्राने तातजीने लॉकजाऊन लावला तेव्हा हजारो लोकं चालत गेली, अनेकांचे जीव गेले, गुजरातमधून १ हजार ३३ श्रमिक ट्रेन सोडल्या तर महाराष्ट्रतून ८०० ट्रेन सोडल्या, नमस्ते ट्रम्पचा कार्यक्रम करुन तुम्ही काय केलं असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. 

आशिष शेलार यांचा इशारा
दरम्यान नाना पटोले यांनी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर भाजपनेही इशारा दिला आहे. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ असा इशारा आशिष शेलार यांनी नाना पटोले यांना दिला आहे. वांद्रे इथं मोफत गावाला पाठवू सांगत गर्दी करणारे कोण होते? हे सेना एनसीपी काँग्रेसवालेच होते, चीनचा हस्तक म्हणून काम करणारे सुप्रिया सुळे-संजय राऊत होते का? अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.