मुंबई : धुळवडीच्या आनंदाला कुठेही गालबोट लागू नये यासाठी, मुंबई उपनगरात तळीरामांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली. आज १८६ तळीराम यांच्यावर पोलिसांची कारवाही करण्यात आलेय.
धुळवडीच्या पार्शवभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांची कारवाई करत १८६मद्यापींवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करत त्यांचा शिमग्याचा चांगलाच इंगा दाखवून दिला. धुळवडीच्या आनंदाला कुठेही गालबोट लागू नये यासाठी, मुंबई उपनगरात तळीरामांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज असलेले पाहायला मिळाले.
त्याचाच भाग म्हणून मुंबईच्या प्रवेश केंद्रांवर वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी केली. या वेळी ड्रंक अँड ड्राइव्ह विरोधी मोहीम, हेल्मेट वापर आणि ट्रिपल सीटचा वापर करणा-या दुचाकीस्वारांवर, वाहतूक विभागानं कारवाईचा बडगा उगारला.