मुंबईच्या माजी महापौरांसह 4 नगरसेवकांना अटक आणि सुटका

शहराचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Viswanath Mhadeshwar) यांची अटकेनंतर सुटका करण्यात आली. 

Updated: Apr 25, 2022, 07:00 PM IST
मुंबईच्या माजी महापौरांसह 4 नगरसेवकांना अटक आणि सुटका  title=

मुंबई : शहराचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Viswanath Mhadeshwar) यांना अटक करून सुटका करण्यात आली. शनिवारी रात्री खार पोलीस ठाण्याबाहेर किरीट सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. (police give bail to ex mumbai mayor vishwanath mhadeshwar and  other 3 coroporater in kirit somaiya case)

खार पोलिसांनी महाडेश्वरांसह चंद्रशेखर वायंगणकर, दिनेश कुबल आणि हाजी हालीम खान या 3 माजी नगरसेवकांना अटक केली. मात्र त्यानंतर लगेचच त्यांची सुटका करण्यात आली. चौघांवरही जामीनपात्र गुन्हे असल्यानं पोलिसांनी कागदपत्रं सादर केल्यानंतर त्यांना टेबल बेल दिली.  

शनिवारी रात्री भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर खार पोलिस स्टेशनबाहेर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह 4 माजी नगरसेवकांना अटक करण्यात आली. त्यानंतर काही मिनिटातच त्यांची यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली.

किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर विश्वनाथ महाडेश्वर, चंद्रशेखर वायंगणकर, दिनेश कुबल आणि हाजी हालिम खान या चार माजी नगरसेवकांवर ही कारवाई करण्यात आली होती. पोलिसांच्या वतीनं या चारही जणांवर लावण्यात आलेली कलमे ही जामिनपात्र होती. त्यामुळे पोलिसांना योग्य ती कायदेशीर कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांना टेबल जामिन मंजूर केला. 

या प्रकरणात आणखी काही शिवसैनिकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. या चौघांच्या नेतृत्वात शिवसैनिक तिथं जमा झाले होते.त्यामुळं यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.