मुंबई : कर्जमाफी, हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी काढलेला लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर धडकलाय. आता शेतकरी आणि कष्टक-यांचा हा मोर्चा आता पुढच्या प्रवासाला निघणार आहे.
शेतक-यांचा लाँग मार्च आता मुंबईच्या दिशेने निघाला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेण्यात आला आहे. तसंच वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.
शेतक-यांच्या आंदोलनाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दर्शवलाय. शेतक-यांच्या या मोर्चाच्या समारोपावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित राहतील अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. तसेच शिवसेना आणि मनसेने देखील या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.