पुन्हा एकदा राजकीय चर्चा, आता प्रशांत किशोर घेणार शरद पवार यांची भेट

राजकीय व्यूहरचनाकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) आज मुंबईत घेणार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. 

Updated: Jun 11, 2021, 10:57 AM IST
पुन्हा एकदा राजकीय चर्चा, आता प्रशांत किशोर घेणार शरद पवार यांची भेट
संग्रहित छाया

मुंबई : राजकीय व्यूहरचनाकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) आज मुंबईत घेणार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे  पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली होती.  त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदीन कार्यक्रमात पवार यांनी भविष्यकाळात महाविकास आघाडीबद्दल केलेले वक्तव्य या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांच्या आजच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

 पवार-मुख्यमंत्र्यांची भेट, पीएम भेटीआधी दोघांमध्ये बैठक

प्रशांत किशोर किशोर यांनी भाजपसाठी सुरुवातीला काम पाहिले. त्यानंतर त्यांनी अनेक राजकीय पक्षांसाठी राजकीय हरचनाकार म्हणून काम पाहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विजयात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावल्यानंतर प्रशांत किशोर पहिल्यांदा चर्चेत आले. यानंतर किशोर यांनी पंजाब आणि बिहारमध्येही स्ट्रॅटजिस्ट म्हणून काम केले होते.

बाळासाहेब थोरात-शरद पवार यांची भेट 

प्रशांत किशोर आज मुंबईत दाखल होत आहेत.  आज सकाळी  11 वाजता ते शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेणार आहेत. या भेटीमागचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदीन कार्यक्रमात भविष्यकाळात महाविकास आघाडीबद्दल केलेले वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांची भेट होत असल्याने महत्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेसोबत आपण कधी सरकार बनवू, असे वाटले नव्हते, शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे, असे वक्तव्य पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदीन कार्यक्रमात केले होते.