राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी; उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना हाय कोर्टाचे आदेश

Maharashtra Political News :  राजकारणातून मोठी बातमी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना मानहानी प्रकरणी दिल्ली हाय कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या याचिकेवरील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Updated: Mar 28, 2023, 01:32 PM IST
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी; उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना हाय कोर्टाचे आदेश

Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी. दिल्ली हाय कोर्टात हजर राहण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना आदेश दिले आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या मानहानी याचिकेवरील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हे तीन नेते हजर राहणार की कोर्टात जाणार याची उत्सुकता आहे.

संजय राऊत,  उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात खासदार राहुल शेवाळे यांनी मानहानीच्या दाव्याची एक याचिका दाखल केली. याबाबत आज दिल्ली हाय कोर्टात सुनावणी झाली. वरिष्ठ वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर  कोर्टाने बदनामीकारक विधानांचे गांभीर्य लक्षात घेऊन, अर्ज स्वीकारला आहे. हा अर्ज स्विकारताना संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना न्यायालयात हजर राहून सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे समन्स बजावले आहे.

न्यायालयाने प्रतिवादींना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरुद्ध मनाई आदेश का काढू नयेत, यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संजय राऊत यांनी खासदार आणि आमदारांविरोधात कोणतीही बदनामीकारक विधाने रोखली, असे म्हटले आहे.

कोर्टाने गूगल, ट्विटर, संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना 30 दिवसांच्या आत तुमच्या यूट्यूब आणि ट्विटरवरील मजकूर का काढू नये, अशी विचारणा केली आहे. तुमचे काही जे म्हणणे आहे ते लेखी दाखल करा,असे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी आता 17 एप्रिल  रोजी अंतरिम सुनावणी होणार आहे.

सत्तांतराबाबत शिंदे गटातील मंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट

 शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 40 आमदारांवर 50 खोक्यांचा आरोप करण्यात येत आहे. शिवसेनेतील बंडाला भाजपची साथ होती ही बाब आता उघड झाली आहे. शिंदे गटाचे नेते आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे बंड कोणामुळे झाले हे आता हळहळू पुढे येत आहे. याला आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही दुजोरा दिला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे  यांच्या अनेक बैठका झाल्यात.

या बंडासाठी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील आमदाराचे मी कौन्सलिंग करत होतो, असा दावा तानाजी सावंत यांनी जाहीर सभेत केला आहे. राज्यातील सत्तांतरासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अनेक बैठका केल्या. एकनाथ शिंदे यांनी शंभर ते दीडशे बैठका केल्या, असे मंत्री तानाजी सावंत म्हणाले.