Mumbai Latest News: सोमवारी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या एंन्टी नारकोटीक्स (Anti Narcotics Squad Raid Mumbai) विभागाने अनेक ठिकाणी छापे मारले. दरम्यान या छापेमारीच्या वेळी तब्बल 11 जणांना अटक करण्यात आली. यावेळी 2.22 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटी नार्कोटिक्स सेलच्या वांद्रे युनिटने विशेष ऑपरेशन सुरू केलंय. त्याअंतर्गत ग्रँट रोड, माझगाव, नागपाडा, आग्रीपाडा येथे छापे टाकण्यात आले.
यावेळी 1.02 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून सात जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर एएनसीच्या वरळी युनिटकडून सांताक्रूझ आणि कॉटन ग्रीन भागात छापे टाकण्यात आले होते. यावेळी 20 लाख रुपये किमतीचे 100 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यापूर्वी, एएनसीच्या आझादी मैदान युनिटनेही छापा टाकला होता आणि बुधवारी भायखळ्यातून 25 वर्षीय व्यक्तीला अटक केली होती. त्याच्याकडून तीन किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन जप्त करण्यात आले. अटक होऊ नये यासाठी तो ठाणे, राजस्थान आणि गुजरातमध्ये ओळख बदलून राहत असल्याचं तपासातून समोर आलं आहे.
मुंबईतील सरकारी रुग्णालयातील वॉर्ड बॉयसह चार जणांना पोलिसांनी अटक केलीये. या सर्वांवर वैद्यकीय कागदपत्रं मिळवण्यात मदत व्हावी यासाठी नागरिकांना किरकोळ दुखापत करण्यासाठी त्यांच्या ज्ञानाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आलाय.