Central Railway Bharti 2023: अनेकजण सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय आता सरकारी नोकरी मिळत नाही. यामुळे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना परीक्षांचे टेन्श असते. मात्र, आता मध्य रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी परीक्षेचं टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण, मध्य रेल्वेची मुंबईत थेट मुलाखतीद्वारे डायरेक्ट भरती होणार आहे. मध्य रेल्वेतर्फे 24 मे 2023 रोजी थेट मुलाखती घेतल्या जणार आहेत. मुलाखतीद्वारे काही पदांसाठी निवड केली जाणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता, निकष तसेच पगार याबाबतची सर्व माहिती जाहीरातीद्वारे प्रसिद्ध केली जाणार आहे.
मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे. 24 मे 2023 रोजी मुलाखतीद्वारे काही पदांसाठी निवड केली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, सेंट्रल रेल्वे, भायखळा, मुंबई – 400027 या पत्त्यावर इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. तत्पूर्वी नेमक्या कोणत्या पदासाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे, त्यासाठी पात्रता निकष व पगार श्रेणी काय आहेत याविषयी सर्व तपशील जाणून घेऊया.
मध्य रेल्वे वैद्यकीय विभागात ही भरती होणार आहे. “विशेषज्ञ / GDMO अशी सहा पदे भरली जाणार आहेत. नोकरीचे ठिकाण मुंबईत असणार आहे. खुल्या गटासाठी 1 जानेवारी 2023 पर्यंत 53 वर्षांपेक्षा कमी वय. निवृत्त वैद्यकीय तज्ज्ञ व केंद्र/राज्य सरकार कर्मचाऱ्यांसाठी- 67 वर्षांपेक्षा कमी वय असणार आहे. वरील पदांकरिता मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी 24 मे 2023 रोजी हजर राहायचे आहे. सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. वॉक इन इंटरव्ह्यू दुपारी बारा नंतर सुरू होणार आहेत.