मुंबईसह उपनगरात पावसाची पुन्हा हजेरी

शहर आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. वांद्रे, अंधेरीसह पश्चिम उपनगरात पावसानं हजेरी लावली आहे. तर माटुंगा, चेंबूर आणि मुलुंडमध्येही जोरदार पाऊस बरसला आहे.

Updated: Sep 19, 2017, 04:42 PM IST
मुंबईसह उपनगरात पावसाची पुन्हा हजेरी title=

मुंबई : शहर आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. वांद्रे, अंधेरीसह पश्चिम उपनगरात पावसानं हजेरी लावली आहे. तर माटुंगा, चेंबूर आणि मुलुंडमध्येही जोरदार पाऊस बरसला आहे.

काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळं काहीसा गारवा निर्माण झाल्यानं दिलासा मिळाला आहे. मात्र या पावसामुळं कुठेही रस्ते वाहतुकीची कोंडी अथवा लोकलचा खोळंबा झालेला नसल्याची माहिती आहे.