Raj Kundra Arrested : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पोलिसांनी केलं अटक

अश्लिल चित्रपट बनवणं आणि प्रसिद्ध केल्याप्रकरणी अटकेची कारवाई

Updated: Jul 19, 2021, 11:12 PM IST
Raj Kundra Arrested : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पोलिसांनी केलं अटक

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला (Raj Kundra) गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. अश्लिल चित्रपट बनवणं आणि प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने हि कारवाई केली आहे. राज कुंद्रा यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असून कुंद्रा यांनीच कारस्थान रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती.  (Raj Kundra has been arrested by the Crime Branch in a case relating to creation of pornographic films and publishing )

आज कुंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. जवळपास 7 ते 8 तास चौकशी केल्यानंतर संध्याकाळी कुंद्रा यांना अटक करण्यात आली. उद्या कुंद्रा यांना न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. राज कुंद्रा विरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे राज कुंद्रा यांना अटक झाल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.