मुंबई : एलफिन्स्टनच्या घटनेनंतर राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, यात राज ठाकरे यांनी थेट नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस सरकारला कडक इशारा दिला आहे. यात त्यांनी मुंबईतील रेल्वेचे प्लॅटफॉर्मची उंची मोजणारे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनाही फटकारलं आहे. तसेच ५ ऑक्टोबर रोजी चर्चगेट स्टेशनवर मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे.
या पुलाचं काम करण्याची जबाबदारी एमएमआरडीएकडे-रेल्वेचं उत्तर - राज यांची माहिती
पुलाबद्दल कुणीही गांभीर्य दाखवलं नाही - राज ठाकरे
शहरांवरील बाहेरचे लोंढे थांबत नाहीत, तोपर्यंत हे थांबणार नाही - राज ठाकरे
पुण्या-मुंबईत पायाभूत सुविधाच नाहीत, ही शहरं आचके देत आहेत- राज ठाकरे
हाच किरीट सोमय्या प्लॅटफॉर्मची उंची मोजायचा, आता गप्प का?- राज ठाकरे
एलफिन्स्टनची कालची घटना दुर्देवी - राज ठाकरे
एव्हीएम मशीनसाठी हाच किरीट सोमय्या बोंबलायचा - राज ठाकरे
नुसतं राजकारण प्रत्येक गोष्टीचं यांना राजकारण करायचंय- राज ठाकरे
संजय गवते एलफिन्स्टनच्या पुलासाठी १० ते १५ भांडतायत- राज ठाकरे
स्टेशनचं नाव बदलून काय होणार आहे- राज ठाकरे
चर्चगेटच्या रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढणार, जाब विचारणार - राज ठाकरे
मुंबईमध्ये बुलेट ट्रेनची एकही वीट रचली जाणार नाही - राज ठाकरे
मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर ती गुजरातमध्ये करावी - राज ठाकरे
जोर जबरदस्ती मुंबईत करायची नाही - राज ठाकरे
सुरेश प्रभू चांगलं काम करत होते, त्यांना का हटवलं मला अजूनही कळत नाही - राज ठाकरे
आयएएस अधिकाऱ्यांच्या लाडापायी त्यांना हटवलं आणि गोयलना आणलं - राज ठाकरे
असा खोटं बोलणारा पंतप्रधान मी पाहिला नाही, मोदी हे खोटं बोलूनच सरकारमध्ये आले- राज ठाकरे
भाजपचे अमित शहा हे ओ जुमला था असं म्हणतात, म्हणजे खोटं बोलूनच हे सरकारमध्ये येतात- राज ठाकरे
अणू शास्त्रज्ञ अनिल काकोडकर आणि डी श्रीधरन यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेच्या सुरक्षिततेचा अभ्यास करण्यासाठी समिती बनवली. समितीची अहवाल यूपीए आणि एनडीए दोन्ही सरकारने गुंडाळून ठेवला- राज ठाकरे
या अहवालातील माहिती देताना राज ठाकरे म्हणले,
दरवर्षी भारतात १५ हजार मृत्यू भारतात, ६ हजार मुंबईत होतात.
माणसं गाडीतून पडणे, शॉक लागणे, रूळ ओलांडताना अपघात होणे
ट्रॅक अॅण्ड रिसर्च सेंटर सुरू करा, असं अनिल काकोडकर यांनी सूचवलं होतं, पण ते झालं नाही.