राज ठाकरे लीलावती रुग्णालयातून परतले, 2 आठवडे राहणार होम क्वारंटाईन

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली होती.

Updated: Oct 23, 2021, 09:17 PM IST
राज ठाकरे लीलावती रुग्णालयातून परतले, 2 आठवडे राहणार होम क्वारंटाईन

मुंबई : मनसे अध्यक्ष (MNS Chief) राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली होती. राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला होता. पण आता राज ठाकरे हे लीलावती रुग्णालयातून उपचार घेऊन परत कृष्णकुंज वर आले आहेत. आता ते 2 आठवडे घरीच क्वारंटाईन राहणार आहेत. (Raj Thackeray corona positive)

राज ठाकरे यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांचं चेकअप करण्यात आलंय. डॉक्टरांनी त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. (Raj Thackeray will be Home Quarantine for 2 weeks)

राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सक्रीय दिसत आहेत. त्यांनी अनेक वेळा पुणे दौरा देखील केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेतला. पण त्यांची प्रकृती बरी नसल्याने इतर त्यांचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले होते.