Rakesh Jhunjhunwala Death:श्रीमंत माणूस, चुरगळलेला शर्ट आणि पीएम मोदींची भेट... निधनानंतर बिग बूल यांचा 'तो' किस्सा पुन्हा चर्चेत

राकेश झुनझुनवाला यांनी शेअर मार्केट विषयी बोलताना म्हटलं होत कि 'मार्केटमध्ये कोणीही बादशाह नसतो 

Updated: Aug 14, 2022, 11:15 AM IST
Rakesh Jhunjhunwala Death:श्रीमंत माणूस, चुरगळलेला शर्ट आणि पीएम मोदींची भेट... निधनानंतर बिग बूल यांचा 'तो' किस्सा पुन्हा चर्चेत title=

शेअर मार्केटचे(share market) 'बिगबुल राकेश झुनझुनवाला'(Rakesh Jhunjhunwala) यांचं रविवारी सकाळी निधन झालं ते ६२ वर्षांचे होते . ब्रीचकॅन्डी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा स्वास घेतला.नुकतचं झुनझुनवाला यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची(PM Narendra Modi) भेट घेतली होती यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच त्यांनी कौतुक केलं होत  . 
त्याच झालं असं कि पंतप्रधान भेटीदरम्यान झुनझुनवाला यांनी अगदी चुरगळलेलं शर्ट घातलं होते .त्या दोघांचा एक फोटो देखील तेव्हा चांगलाच वायरल झाला होता. 
यावर झुनझुनवाला यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती कि ''आता शर्टच असा होता जो आधी प्रेस केला होता पण चुरगळाला आता त्याला मी काय करणार'' असं म्हणून त्यांनी या फोटोवर प्रतिक्रिया दिली होती 
शेअर मार्केटचे बिग बुल राकेश झुनझुनवाला पुढे म्हणाले कि, ''आता शर्टच असा  त्यात काय करायचं आणि मला याचा फरक पडत नाही मला कुठे कस्टमर किंवा क्लाईन्ट  बनवायचे होते '' 

 

या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी 'वन अँड ओन्ली झुनझुनवाला' असं म्हणत  झुनझुनवाला यांची प्रशंसा केली होती भारतातले एक चांगले व्यक्ती असून भारताप्रती त्यांना अतिशय प्रेम आहे असं मोदींनी म्हटलं होतं. 

दरम्यान राकेश झुनझुनवाला यांनी शेअर मार्केट विषयी बोलताना म्हटलं होत कि 'मार्केटमध्ये कोणीही बादशाह नसतो येत्या काळात भारताचा विकास दर नक्कीच वाढणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता या काही वर्षात भारताचा विकास दर जवळपास १० टक्क्यांनी वाढेल असं ते म्हणाले होते. 

 

झुनझुनवाला यांच्या निधनामुळे सर्व स्तरातून श्रद्धांजली देखील देण्यात आली आहे भारतीय शेअर मार्केटचं मोठं नुकसान झालं हे मात्र नक्की.