राहुल गांधींना पक्ष सांभाळता येत नाही, देश काय सांभाळणार - रामदास आठवले

राहुल गांधी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आठवलेंची टीका

Updated: Sep 23, 2019, 12:30 PM IST
राहुल गांधींना पक्ष सांभाळता येत नाही, देश काय सांभाळणार - रामदास आठवले

मुंबई : केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. याचबरोबर त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत टीका देखील केली. राहुल गांधी आपला पक्ष व्यवस्थित सांभाळू शकत नसतील, तर ते देश कसा चालवतील? असा सवाल करत, म्हणूनच त्यांचा अमेठीतून पराभव झाला, असे आठवले म्हणाले.

पाच वर्षे सतत चांगले काम करूनही काही लोकांनी पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. परंतु मोदींना पर्याय नाही, हे आता लोकांना समजले आहे, असे आठवले म्हणाले.

२१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना आणि छोट्या पक्षांची युती २४० ते २५० जागा जिंकेल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. 

भाजप आणि शिवसेनेने त्यांचे काही लहान मुद्दे सोडून, दोघांच्या ताकदीच्याआधारे निवडणूक लढवण्याचे सांगितले.