रणबीरमुळे अनेकवेळा माझ्यावर अपघाताची वेळ - दिशा पटानी

रणबीर कपूरवर आपला कसा क्रश होता, याविषयी दिशा पटानीने सांगितलं आहे. 

Jaywant Patil Updated: Apr 3, 2018, 07:29 PM IST
रणबीरमुळे अनेकवेळा माझ्यावर अपघाताची वेळ - दिशा पटानी title=

मुंबई : रणबीर कपूरवर आपला कसा क्रश होता, याविषयी दिशा पटानीने सांगितलं आहे. रणबीर कपुरमुळे मी अनेक वेळा अपघातग्रस्त होता होता बचावले, असे दिशा पटानीने म्हटले आहे.  रणबीर कपूरवर हा कोणताही आरोप नाही, तर तिने आपल्या किशोर वयातील ‘क्रश’ किती 'गंभीर' होता ते सांगितलं आहे. रणबीरचे रस्त्यावरील पोस्टर पाहत जात असताना, अनेक वेळा समोरून येणाऱ्या वाहनाकडे आपण वाहनाला धडकण्यासारखी परिस्थिती निर्माण होत होती, असं तिने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

अशामुळे येत होती अपघाताची वेळ

मी बरेलीत राहत होते आणि तिथेच शिकत होते. त्यावेळी शाळेला जात असताना माझे लक्ष नेहमीच, चौकात लावलेल्या रणबीरच्या एका जाहिरातीकडे जात असे. स्कूटीवरून जात असताना मी हे पोस्टर एकटक पाहत असे आणि त्यामुळे अर्थातच अनेक वेळा धडकण्याची स्थिती निर्माण होत असे. नृत्याबाबत अनेक वेळा टायगर श्रॉफशी माझी तुलना करण्यात येते, पण मी अशी तुलना करीत नाही. आमच्या दोघांची डान्सिंग स्टाईल वेगवेगळी आहे. त्याला मायकल जॅक्सन आवडतो तर मला बेयॉन्स आवडतो, असं दिशा पटानीने म्हटलं आहे.

आम्ही एकत्र डान्स करतो, पण...

मात्र, आम्ही दोघे एकत्र डान्स करतो, त्यावेळी आमची जोडी चांगली दिसते, असे अनेकांचे म्हणणे आहे. अर्थात आमच्यात कोण अधिक चांगले नृत्य करीत आहे, याची स्पर्धाही लागलेली असते, तो अतिशय उत्तम डान्सर असल्याने त्याच्याबरोबर डान्स करणे ही काही सोपी गोष्ट नाही, त्यासाठी तेवढी मेहनतही करावी लागते.