रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्राची बदनामी केली; जितेंद्र आव्हाडांचे गंभीर आरोप

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले.

Updated: Mar 24, 2021, 09:50 PM IST
रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्राची बदनामी केली; जितेंद्र आव्हाडांचे गंभीर आरोप title=

 दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बदल्यांच्या रॅकेट संदर्भात केलेल्या फोन टॅपिंगचा मुद्दा चांगलाच तापला आहे. 

 आज मंत्रींमंडळात झालेल्या बैठकीत परमबीर सिंह पत्र आणि रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग रेकॉर्ड याबाबत चर्चा करण्यात आली. त्याबाबत मंत्री जितेंद्र  आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
 
 रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगच्या चुकीच्या परवानग्या घेतल्या. त्याचा वापर त्यांनी मंत्र्यांचे गोपनिय संवाद रेकॉर्ड करण्यासाठी केला. रश्मी शुक्ला यांनी गोपनियतेचे उल्लंघन केले आहे. असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
 
 केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, देशाविरोधात होणाऱ्या घातक आणि धोकादायक कृत्यांना आळा घालण्यासाठी फोन टॅपिंगचा वापर केला जातो. रश्मी यांनी केलेले फोन टॅपिंग हे कायद्याला धरून नाही. ते संयुक्तीकही नाही. डीजी लेव्हलची व्यक्ती महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राला बदनाम करीत असेल, महाराष्ट्राला रक्तबंबाळ करीत असेल तर कसं सहन करायचं. अशी टीकाही आव्हाड यांनी केली.
 
 रश्मी यांनी एकाच्या नावाची  परवानगी घेतली आणि दुसऱ्यांचे फोन टॅप केले आहेत. त्याला महाराष्ट्रात बदल्यांच्या नावाखाली रॅकेट असे नाव दिले आहे. यामुळे नोकरशाहीने सरकारचा विश्वासघात केला  असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे